Home अहमदनगर बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला ठेकेदाराकडून मारहाण

बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याला ठेकेदाराकडून मारहाण

Crime News engineer of construction department beaten by contractor

जामखेड | Crime News: खडीचे पैसे का दिले नाहीत असे म्हणून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे कनिष्ठ अभियंता रवींद्र ससाणे यांना ठेकेदार शरद शिवराम पवार याने मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, रविंद्र ससारे यांनी म्हंटले आहे की, दिनांक २३ रोजी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जामखेड तालुक्यात करण्यात आलेल्या हळगाव ते आगी हळगाव ते गोयकरवाडी रोडचे कामाची पाहणी करून वाहनाने हळगाव ते ढवळे वस्ती रोडची पाहणी करण्यासाठी निघालो असता हळगाव बसस्थानक परिसरात ठेकेदार पवार याने आमच्या सरकारी गाडीला आडवे येऊन तुम्ही मला शिऊर ते बसरवाडी रस्त्याचे केलेल्या कामात वापरलेल्या खडीचे पैसे का दिले नाहीत असे म्हणून फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अधिक तपास जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड हे करीत आहे.

Web Title: Crime News engineer of construction department beaten by contractor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here