Home अहमदनगर तुला दुसरी बायको पाहून देतो असे म्हणत पती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण

तुला दुसरी बायको पाहून देतो असे म्हणत पती पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण

Crime News Husband and wife beaten with batons

राहुरी | Crime News: मला पहिली बायको आहे, दुसरी नको, तू दारू पिऊन काही बोलू नकोस असे म्हणाल्याचा राग आल्याने प्रदीप विधाते याने अशोक विधाते व त्यांच्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. राहुरी तालुक्यातील वरशिंदे येथे ही घटना घडली.

याबाबत अशोक सीताराम यांनी राहुरी पोलिसांत फिर्याद दिली असून पोलिसांनी प्रदीप वसंत विधाते याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अशोक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार. अशोक विधाते हे सायंकाळी ७ वाजेदरम्यान राहुरी तालुक्यातील वर्शिंडे गावचे चावडी समोर उभे असताना त्याचा गावात राहणारा प्रदीप वसंत विधाते हा तिथे दारू पिऊन आला. आणि अशोकला म्हणाला की, तुम्हाला दुसरी बायको पाहून देतो तेव्हा अशोक म्हणाले की, मला पहिली बायको आहे. तू दारू पिऊन असे काही पण बोलू नकोस असे म्हणाला असता त्याचा त्यास राग येऊन अशोक विधाते यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. धारदार वस्तूने जखम केली. यावेळी अशोक विधाते यांची पत्नी रंजना भांडण सोडविण्यास मध्ये गेल्या असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी माताहन करत तुम्हाला पाहून घेतो असा दम देऊन निघून गेला. यानंतर अशोक विधाते यांनी थेट राहुरी पोलीस स्टेशन गाठले.  

Web Title: Crime News Husband and wife beaten with batons

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here