Home अहमदनगर अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणास अटक

अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करणाऱ्या तरुणास अटक

Crime News Man arrested for abusing minor girl

अहमदनगर  | Ahmednagar | Crime News:  अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करून तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गिरीश सुनील वरकड (रा. बुरूडगाव रोड, नगर)  या तरुणाविरूद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.  पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला 6 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत सुनावली आहे.

गिरीश वरकड अल्पवयीन  मुलीस  स्नॅप चॅट अ‍ॅपवर तिच्याशी ओळख करून मोबाईलच्या माध्यमातून वेळोवेळी फोन करून, मिस कॉल व मेसेज करून तिचा छुपा पाठलाग केला. तसेच तिला हातवारे करून तिच्याशी गैरवर्तन केले. ती कुठे आहे, माझे तिच्यावर प्रेम आहे. तिला नगरला आणले नाही, तर तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारून टाकीन, अशी मला धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने आरोपी वरकड याचा शोध घेतला. तो दिल्ली गेट परिसरामध्ये असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक यांच्या पथकाने त्यास अटक केली आहे.

Web Title: Crime News Man arrested for abusing minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here