Accident: ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक
शेवगाव | Accident: न्यायालयाचे कामकाज आटोपून घराकडे जात असताना दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात शेवगावचे द्वारकानाथ बटूळे यांच्या हाताला दुखापत झाल्याने जखमी झाले आहेत. याप्रकरणी बटूळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने चालक अशोक कळसू गवई रा. इसोली ता. चिखली जि. बुलढाणा याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बटूळे हे रेसिडेंटल हायस्कूल समोरून जात असताना पाठीमागून बाजूने भरधाव वेगाने आलेल्या १४ टायरच्या कंटेनरने बटूळे यांच्या दुचाकीस पाठीमागच्या बाजूने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डाव्या हातास जबर मार लागून दुखापत झाली. दुचाकीचे नुकसान झाले. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक अशोक कळसू गवई याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Accident truck hit the two-wheeler from behind