Home क्राईम संगमनेरात चोरीचे सत्र सुरूच: घरासमोरून बुलेट वाहन चोरीला

संगमनेरात चोरीचे सत्र सुरूच: घरासमोरून बुलेट वाहन चोरीला

Sangamner Theft Bullet vehicle stolen in front of house

संगमनेर | Theft: संगमनेर शहरात मालदाड रोड येतील गणेश विहार कॉलनीमधून बुलेट वाहन चोरीला गेल्याची घटना घडली आहे.

घरासमोरील वाहनतळात उभी केलेली बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २७ नोव्हेंबर सकाळी सहा वाजेच्या सुमारास एम.एच.१६ सी.बी. ८२२२ या क्रमांकाची पांढऱ्या रंगाची बुलेट मोटारसायकल मालदाड रोड येथील गणेश विहार कॉलनी येथून चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात सुरेश जयवंत थोरात रा. गणेश विहार कॉलनी संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वाहन चोरीचा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.  दरम्यान संगमनेर शहरात चोरीच्या सत्राची मालिका सुरु असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

Web Title: Sangamner Theft Bullet vehicle stolen in front of house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here