Home Accident News साकुर संगमनेर रोडवर अपघात एकाचा जागीच मृत्यू

साकुर संगमनेर रोडवर अपघात एकाचा जागीच मृत्यू

One died on the spot in an accident on Sakur Sangamner and theft

संगमनेर | Accident: अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी सायंकाळी घडला. 

रविवारी साकुर संगमनेर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा आकस्मिक मृत्यू झाला. साकुर संगमनेर रोडवारीला चिंचेवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत साकुर परिसरातील एका व्यक्तीचे निधन झाले आहे. सदर घटनेची नोंद अकस्मात मृत्यूची नोंद घारगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास घडली. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंदाजे वय ५० असू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे.  पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.   


Theft: इलेक्ट्रिक मोटार चोरीचे सत्र थांबेना; एकामागून एक संकटांनी शेतकरी संतप्त

संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील शेतकरी आधीच एकामागून एक संकटांनी वैतागले आहेत त्यातच आता पुन्हा गेल्या काही दिवसांपासून शेतकर्‍यांच्या पाठीमागे नवे संकट उभे राहीले आहे ते म्हणजे इलेक्ट्रिक मोटारी चोरी जाण्याचे.शिंदोडी येथील न्यामेश किशोर सराफ यांची चोरट्याने इलेक्ट्रिक मोटारीसह केबलही चोरून नेली आहे त्यामुळे आता शेतकरी चांगलेच संतप्त झाले आहे.

याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की शिंदोडी येथे न्यामेश सराफ यांची शेती असून संजय शंकर हासे हे शेती वाट्याने करत आहे शेतातील शेततळ्यावर असलेली २५ हजार रूपयांची इलेक्ट्रिक मोटार व ५ हजार रुपयांची दिडशे फुट केबल असा एकूण ३० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून (Theft) चोरट्याने पोबारा केला आहे.याप्रकरणी संजय हासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २७८ / २०२१ भादवी कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: One died on the spot in an accident on Sakur Sangamner and theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here