Home क्राईम संगमनेर तालुक्यात सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात सरपंचावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime News molestation has been registered against the sarpanch in Sangamner 

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील कसारे येथील ग्रामपंचायत सदस्यास जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपावरून दोघांविरुद्ध atrocity चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका महिलेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून सरपंचांसह तिघाविरुद्ध संगमनेर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सरपंच यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी दुपारी सरपंच हे आपल्या मुलीस तळेगाव येथील दवाखान्यात घेऊन जात असताना नांदूर शिंगोटे ते लोणी जाणाऱ्या रोडवर वडझरी परिसरात वरील दोघांनी सरपंचाच्या गाडीस गाडी आडवी लावली. एका जुन्या चपलांचा हार काढून तो सरपंचाच्या गळ्यात टाकण्यात आला. आम्ही महारांच्या सरपंचाचा असाच सत्कार करतो असे म्हणत त्यांचा पानउतारा केला असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी   कृष्णाजी सूर्यभान कार्ले व मच्छिंद्र हिरामण कार्ले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसरी फिर्याद ३० वर्षीय महिलेने दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, पतीसमवेत आपण मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घरी जात असताना आरोपी सरपंच महेश अण्णासाहेब बोराडे, चंद्रकांत अण्णासाहेब बोर्हाडे व एक महिला रा. कसारे आरोपींनी लज्जा निर्माण होईल असे कृत्य केले. शिवीगाळ व दमदाटी करून गळ्यातील सोन्याची पोट बळजबरीने हिसकावून घेत आमच्या नादाला लागाल तर तुमच्यावर atrocityचा गुन्हा दाखल करीन अशी धमकी दिली. या फिर्यादीवरून वरील तिघांवर विनयभंगासह विविध कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय खंडीझोड या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे.

Web Title: Crime News molestation has been registered against the sarpanch in Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here