संगमनेरातील एकाने निर्दयी कुत्र्याची हत्या केल्याने गुन्हा दाखल
संगमनेर | Crime News: संगमनेर शहरातील लालतारा कॉलनी येथील सोपान पानसरे या व्यक्तीने एक वर्षाच्या राणी नावाच्या कुत्रीला दगडांनी व काठ्यांनी मारून जखमी केले. तिला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र गंभीर जखमी झालेल्या राणीचा मृत्यू झाला.
२७ सप्टेंबर रोजी सुतार गल्ली येथील सोपान निवृत्ती पानसरे या व्यक्तीने निर्दयीपणे एका कुत्रीला काठीने व दगडाने मारून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती जाणता राजा वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष मुकेश नरवडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी त्या कुत्रीला उपचारासाठी पंचायत समितीच्या जनावरांच्या दवाखान्यात दाखल केले. दोन ते तीन दिवस तिच्यावर उपचार केले मात्र १ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime News One of Sangamner killed a ruthless dog