Home अहमदनगर Crime News: अल्पवयीन विवाहितेचे बालिकेसह अपहरण

Crime News: अल्पवयीन विवाहितेचे बालिकेसह अपहरण

Crime News Kidnapping of a minor married girl

अहमदनगर | Crime News: अल्पवयीन मुलीचे आईने लग्न लावून दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मुलीची आई, पती व सासऱ्याविरोधात अत्याचार पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच पिडीत अल्पवयीन मुलीला जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याकरीता आणले असता तेथून पिडीत मुलीसह तिच्या बालिकेचे अपहरण  झाल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरातील एका अल्पवयीन मुलीचा लग्नाला विरोध असताना लग्न करून दिल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. इच्छा नसतानाही पतीने वेळोवेळी शरिरसंबंध ठेवले. त्याला जुगाराचा नाद असल्याने तो जुगारात पैसे हरल्यानंतर मला घरी येऊन त्रास देत, माझ्या आईला मारून टाकयची धमकी देत असल्याचे, पिडीताने फिर्यादीत म्हटले आहे. पिडीत अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने तिला महापालिकेच्या रूग्णालयात दाखल केले. तिने एका मुलीला जन्म दिला.

याप्रकरणी पिडीताने चाईल्ड लाईनची मदत घेत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे कर्मचारी या मुलीला व तिच्या बालिकेला घेऊन जिल्हा रूग्णालयात आले होते. तेथून तिच्यासह बालिकेचे अपहरण झाले आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या कर्मचारी महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक सोळुंके करीत आहे.

Web Title: Crime News Kidnapping of a minor married girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here