Home अहमदनगर धक्कादायक: पोलिसांवरच सात जणांनी केला जीवघेणा हल्ला

धक्कादायक: पोलिसांवरच सात जणांनी केला जीवघेणा हल्ला

Crime News Police in riot gear stormed a rally on Friday

अहमदनगर | Ahmednagar: पसार आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसावर सात जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना नगर तालुक्यातील कारगाव चौकात घडली. या हल्ल्यात नगर तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी भरत बाजीराव धुमाळ हे जखमी झाले आहे. त्यांच्यावर नगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

हवालदार धुमाळ हे फरार आरोपी रमेश भोसले याला अटक करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे असलेल्या सात जणांनी धुमाळ यांना पकडून लाकडी दांडके, दगड, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी धुमाळ यांच्या दुचाकीचे नुकसान केले आहे.

जखमी झालेल्या धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हल्ला करणारे रमेश सावत्या भोसले, तुषार सावत्या भोसले, आत्मशा सावत्या भोसले, सावत्या भोसले, अविनाश ऊर्फ सुरशा भोसले, शेरीना रमेश भोसले व एक अनोळखी (सर्व रा. पिंपळगाव कौंडा ता. नगर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Web Title: Crime News Police in riot gear stormed a rally on Friday

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here