Home अहमदनगर पोलिसांना धक्काबुक्की, चार जणांवर गुन्हा, दोघांस अटक

पोलिसांना धक्काबुक्की, चार जणांवर गुन्हा, दोघांस अटक

Crime News Police pushback  

कोपरगाव | Crime News: कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे पथकासह गस्तीवर असताना शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील जेऊर कुंभारी हद्दीतील हॉटेल स्वस्तिक येथे स्टाफला त्रास देत तरुण दारूच्या नशेत जेवणावरून वाद आपापसांत मारहाण करीत होते. त्यांना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या पथकातील पोलिसांनी धक्काबुक्की केली.

शहर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बबन नाथा साठे यांच्या फिर्यादीवरून आनंद भारतसिंग परदेशी वय ३० रा. निवारा ता. कोपरगाव, सुनील बाळासाहेब पांडे वय २८ रा. बेत कोपरगाव, विजय लक्षमण इस्ते, आकाश रंगनाथ लोखंडे रा. कोकमठाण यांच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील आनंद परदेशी व सुनील पांडे या दोघांना अटक केली आहे. तर दोघे जण फरार झाले आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

Web Title: Crime News Police pushback  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here