Home अहमदनगर सात दुकानाला आग लागून भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

सात दुकानाला आग लागून भस्मसात, लाखो रुपयांचे नुकसान

Ahmednagar News Seven shops were gutted in the blaze

अहमदनगर | Ahmednagar News: शनिवारी दुपारी शहरातील तपोवन रोडवरील बांधण्यात आलेल्या पत्र्याच्या गाळ्यांना आग लागून सात दुकानातील साहित्य खाक झाल्याची घटना घडली आहे. महापालिका व एमआयडीसी येथील अग्निशमन पथकाच्या दोन तासांच्या प्रयत्नातून ही आग आटोक्यात आली. या घटनेत दुकानदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तपोवन रोडवरील लक्ष्मीनगरजवळ आठ पत्र्यांचे गाळे बांधण्यात आले आहे. यामध्ये डेअरी, हार्डवेअर, कपडे, ज्वेलरी, गिरणी अशी दुकाने होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी शोर्टसर्किटमुळे या गळ्यातील कपड्याच्या दुकानाला प्रथम आग लागली. नंतर काही वेळातच ही आग शेजारील गाळ्यांना लागली. या घटनेची माहिती मिळताच महापालिका व एमआयडीसी येथील पाच अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. तसेच तोफखाना पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी तैनात केले होते. कपड्याच्या दुकानाला आग लागली तेव्हा शेजारील दुकानदारांनी आपल्या दुकानातील माल तात्काळ बाहेर काढत नुकसान टाळले. आगीच्या घटनेनंतर महापौर रोहिणी शेंडगे यांनी पाहणी केली.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

Web Title: Ahmednagar News Seven shops were gutted in the blaze

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here