कॉलेजमध्ये विद्यार्थ्यावर रॅगिंग प्रकरणी दोघांवर गुन्हा, एकास अटक
कोपरगाव | Crime News: एका विद्यार्थ्यास जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करून अंगात घातलेली पँट काढण्यास भाग पडून त्यांची चेष्टा केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका आरोपीस अटक करण्यात आली असून दुसरा फरार झाला आहे.
कोळपेवाडी येथील डॉ. कोळपे नर्सिंग कॉलेजमध्ये शनिवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी पिडीत विद्यार्थ्याचा मित्र यश राजेंद्र भोसले याने फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून पवन कोळपे, राजू ढोणे रा. कोळपेवाडी यांच्याविरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवन कोळसे याला पोलिसांनी अटक केली आहे. राजू ढोणे हा फरार झाला आहे.
नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी कॉलेजच्या स्पेसमध्ये वाढदिवस साजरा करीत असताना गावातील दोघांनी कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी झालेल्या वादाच्या कारणातून एका शिवीगाळ करत पँट काढण्यास भाग पाडले होते.
Web Title: Crime News ragging case against student in college