Home अहमदनगर वाढदिवसाला तलवारी घेऊन नाच करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

वाढदिवसाला तलवारी घेऊन नाच करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

Crime News against seven people for dancing with swords

श्रीरामपूर | Crime News:  वाढदिवस साजरा करताना हातात तलवारी घेऊन संगीताच्या तालावर ठेका धरणाऱ्याना वाढदिवस चांगलाच महागात पडला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोलिसांनी या 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून तिघा जणांना अटक केली आहे.

पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके (रा. गोंधवणी) यांच्यासह 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके यांना अटक करण्यात आली आहे.

श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्र. 2 मधील काझीबाबा रोड परिसरात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास काहीजण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली असता तेथे काहीजण बेकायदेशीर जमाव जमवून हातात तलवारी घेऊन संगीताच्या तालावर आरडाओडा करत नाचत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याच्याकडील 4 हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करीत त्यांना अटक केली.

Web Title: Crime News against seven people for dancing with swords

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here