Home Accident News संगमनेर: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

संगमनेर: महामार्ग ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू

Sangamner Accident Tarsa dies after being hit by an unidentified vehicle 

संगमनेर | Sangamner Accident:  पुणे नाशिक महामार्गावर माहुली (ता.संगमनेर) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांच्या तरस मादीचा मृत्यू झाल्याची घडली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.  

याबाबत मिळालेली माहिती माहिती अशी की, मंगळवारी पहाटे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात महामार्ग ओलांडण्याच्या नादात भरधाव वेगात असणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत दोन वर्षीय तरस मादीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक बाळासाहेब वैराळ, दीपक वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर मृत तरसाला कोठे बुद्रुक येथील रोपवाटिकेत आणून अंत्यसंस्कार केले.

वर्दळीचा असणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वन्य प्राण्यांसाठी डोकेदुखी बनत असल्याचे चित्र समोर आलेले आहे. याआगोदरही  महामार्ग ओलांडण्याच्या नादात बिबटे व अन्य प्राण्यांना जीव गमवावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

Web Title: Sangamner Accident Tarsa dies after being hit by an unidentified vehicle 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here