Home अहमदनगर Nagar urban bank election result 2021: नगर अर्बन बँकेच्या निवडणूक सहकार पॅनलचे...

Nagar urban bank election result 2021: नगर अर्बन बँकेच्या निवडणूक सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

Nagar urban bank election result 2021

अहमदनगर | Nagar urban bank election result 2021: प्रमुख विरोधी उमेदवारांनी माघात घेतल्याने औपचारिकता ठरलेल्या नगर अर्बन बँकेच्या निवडणूक निकालावर सहकार पॅनलने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व राखले.

दुपारपर्यंत शहर मतदारसंघातील १० सदस्यांसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल हाती आला. १४ उमेदवार रिंगणात असलेल्या या मतदारसंघात सहकार पॅनलच्या सर्व १० उमेदवारांनी विजय साजरा केला.

दरम्यान, बँकेचा अधिकृत निकाल बुधवारी सकाळी ११ वाजता जाहीर केला जाणार असून दुपारी ३ वाजेनंतर नूतन संचालकांच्या बैठकीत अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड होणार आहे.

ऐनवेळी प्रमुख विरोधकांनी माघार घेतल्याने निवडणूक एकतर्फी झाली. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी ही निवडणूक झाली. यापैकी ४ जागा सत्ताधारी दिलीप गांधी गटाने बिनविरोध जिंकल्या होत्या. निकाल काय लागणार याचा अंदाज आल्याने मतदानावरही परिणाम झाला. त्यामुळे मतदानाची टक्केवारी अवघ्या ३१.६५ टक्क्यांवर घसरले.

असे झाले मतदान:

अजय अमृतलाल बोरा १६३२३

अनिल चंदूलाल कोठारी १६१७४

गिरीष केदारनाथ लाहोटी १५७३८

दीप्ती सुवेंद्र गांधी १६१७१

राजेंद्र आत्माराम आग्रवाल १५८६१

ईश्वर बाबूशेठ बोरा १६१४९

महेंद्र मोहिनीराज गंधे १५८८५

राहुल नरेंद्र जामगावकर १५८०६

शैलेश सुरेश मुनोत १५९६३

संपतलाल धनराज बोरा १५३२५

स्मिता महावीर पोखरणा १५६६

संजय शिवाजी डापसे १०३९

संपतलाल धनराज बोरा १५३२५

Web Title: Nagar urban bank election result 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here