दोन दिवसांतच नवरीचे पितळ उघडे, लग्नाचा बनाव करून २ लाखाला गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
श्रीगोंदा | Crime News: जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाशी लग्नाचा बनाव करून वरपित्याला २ लाखांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मंगळवारी श्रीगोंद्यात करण्यात आला आहे. बनावट नवरीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी नवरी दिपाली विजय बडोदे रा. सासवड ता. पुणे बापू शंकर दातीर रा. श्रीगोंदा, कुंडलिक शाहू चव्हाण, अनिता भगवान गिरे रा. औरंगाबाद यांच्यासह हडपसर येथील वैशाली नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली बडदेला ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपी पसार आहेत.
फसवणूक झालेल्या पिंपळखेड येथील तरुणाने फिर्याद दाखल केली आहे. त्या तरुणास १८ जून रोजी बापू दातीर याने फोन करून सांगितले की, पाहुणे मुलगी घेऊन आले आहेत तुम्ही श्रीगोंदा येथे या. त्यांनतर तरुण व त्याचे आई वडील श्रीगोंदा येथे आले. यावेळी नियोजित नवरी म्हणून दिपाली समोर आली. मुलाला मुलगी पसंत झाली. यावेळी दातीर याने मुलीच्या वडिलांना देण्यासाठी मुलाच्या नातेवाईकांकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर १९ जून रोजी लग्न झाले. विवाहानंतर नव्या नवरीने नखरे दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा तिला विचारपूस केल्यानंतर तिने बनावट लग्नाबाबत सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल झाला असून दिपाली हिस पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
Web Title: Crime News robbed 2 lakhs by making a marriage