अहमदनगर | Crime News: नगर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने ५ ते ६ विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका विद्यार्थिनीच्या पालकाने फिर्याद दाखल केली आहे.
संतोष एकनाथ माघाडे (वय 34 रा. गंगापूर जि. औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. त्यास पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या शिक्षकास आज न्यायालयात हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
सध्या शाळेत ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना शाळेत हजर राहण्याचे आदेश आहे. शाळेतून ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देतात. शिक्षक संतोष माघाडे हा ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थींनीना शाळेत बोलून घेत असे व त्यांच्याशी अश्लील चाळे करत असल्याची बाब समोर आली आहे. विद्यार्थींनीनी हा प्रकार घरी सांगितल्यावर पालकांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक सानप करीत आहे.
Web Title: Crime News teacher’s obscene jokes with the student