वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस लग्नाचे अमिष देऊन पोलीस कॉन्स्टेबलकडून अत्याचार
श्रीरामपूर | Crime News: वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या तरुणीस एका पोलीस कॉन्स्टेबलने लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवून गर्भवती ठेवून गर्भपाताच्या गोळ्या घेण्यास भाग पाडून गर्भपात करण्यास भाग पाडून तसेच पत्नी व मुले असल्याची माहिती लपवून ठेऊन फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलविरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सन २०१६-१७ साली एका गुन्ह्याच्या तपासात ओळख झाली. आरोपी व पारनेर तालुक्यातील पानोली परिसरात राहणाऱ्या अत्याचारित तरुणीची ओळख झाली. २०१९ पासून या तरुणीस लग्नाचे अमिष दाखवत श्रीरामपूर येथील फ्लॅटवर तसेच बाभळेश्वर व शिर्डी येथे लॉजवर नेवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. त्यातूनच ती तरुणी गर्भवती राहिली. गर्भवती असल्याचे वायकर यास कळाले असता त्याने गर्भपात करण्यास भाग पाडले. . तसेच त्याचे लग्न झालेले होते. त्यास अपत्य असल्याची माहिती त्याने लपवून ठेवून फसवणूक केली. तुळशीराम वायकर हा १४ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ही तरुणी रहात असलेल्या श्रीरामपूर योथील फ्लॅटवर आला व बळजबरी शरिर संबंध ठेवले व दुसऱ्या दिवशी सकाळी ड्युटीवर जातो व संध्याकाळी परत येतो, असे सांगून गेला ते परत अद्याप पर्यंत आलाच नाही.
त्यामुळे ही पिडीत तरुणी ३ सप्टेंबर २०२१ रोजी आरोपीच्या मुळगावी नेवासा तालुक्यातील भेंडा येथे त्याचे घरी गेली असता तुळशीराम उर्फ राजु पोपट वायकर व त्याची आई सईबाई पोपट वायकर, पत्नी हिराबाई तुळशीराम वायकर यांनी या तरुणीस तू खालच्या जातीची असून आमच्या घरात तुला घेणार नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. तर आरोपी तुळशीराम उर्फ राजू वायकर म्हणाला, तुझा माझा काहीएक संबंध नाही. तु परत येथे दिसलीस तर तुला मारुन टाकीन, अशी धमकी दिली.
याप्रकरणी पिडीत तरुणीने श्रीरामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तुळशीराम उर्फ राजू पोपट वायकर, सईबाई पोपट वाकर, हिराबाई तुळशीराम वायकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Crime News Torture by a police constable by luring a young woman