जुन्या वादातून तीक्ष्ण हत्याराने तरुणाचा निर्घुण खून
पाथर्डी | Murder: जुने भांडण व वादातून पाथर्डी तालुक्यातील खेर्डे येथील तरुणाचा खून झाल्याची घटना घडली आहे राजेंद्र रामकीसन जेधे (वय ३०) या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने निर्घुणपणे खून करण्यात आला आहे. मयत तरूण हा एका पेट्रोल पंपावर कामास होता. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
आरोपी प्रशांत बबन शेळके (वय २३), प्रवीण बबन शेळके (वय २६), बबन जगन्नाथ शेळके (वय ४७), (सर्व राहणार खेर्डे ता.पाथर्डी) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शेवगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, पोलीस कॉन्स्टेबल एकनाथ बुधवंत, भगवान सानप, अतुल शेळके, राहुल खेडकर आदी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण हे अधिक तपास करीत आहे.
शेषराव दत्तू जेधे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, पुतण्या राजेंद्र जेधे व गावातील प्रशांत शेळके यांच्यात दोन वर्षांपूर्वी गावातील एका लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद व हाणामारी झाली होती. त्यावेळी तक्रार न करता आपसात वाद मिटला गेला होता, मात्र. तेव्हापासून मनात खुन्नस धरून नेहमी क्षुल्लक कारणावरून एकमेकासोबत वाद, भांडण करत होते. शुक्रवारी (दि. ३) रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपी किशोर भाऊसाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके, बबन जगन्नाथ शेळके हे घराजवळ येऊन यांनी मोठ्याने आवाज देऊन जेधे याला घराबाहेर बोलावून रस्त्यावर ओढले व शिवीगाळ केली.
यामधील आरोपी प्रशांत शेळके याने त्याच्या हातातील चाकूने मयत जेधे याच्या पोटावर मारल्याने गंभीर दुखापत होऊन जेधे याचा मृत्यू झाला. त्यांनतर रात्री उशीरा त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात जेधेला मृत घोषित करण्यात आले. यातील आरोपी प्रशांत शेळके याने त्याच्या हातात असलेल्या चाकूने मयत जेधे याच्या पोटावर मारल्याने गंभीर दुखापत होऊन जेधे याचा मृत्यू झाला. त्यांनतर रात्री उशीरा त्याला पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालय आणि त्यानंतर नगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. जिल्हा रुग्णालयात जेधेला मयत घोषित करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली आहे.
Web Title: Brutal murder of a young man with a sharp weapon