Home अहमदनगर Crime News: घरात घुसून महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

Crime News: घरात घुसून महिलेस लाथाबुक्क्यांनी मारहाण

Crime News woman broke into the house and was beaten 

राहुरी | Crime News: राहुरी तालुक्यातील तांदूळनेर येथे तुळसाबाई धोत्रे यांच्या घरात अनधिकृतपणे घुसून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना ६ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुळसाबाई एकनाथ धोत्रे वय 70 वर्ष रा. तांदुळनेर ता. राहुरीयांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, रात्री ११ वाजेच्या सुमारास तुळसाबाई व त्यांचा मुलगा घरात असताना आरोपी हे न विचारता घरात घुसले आणि म्हणाले तुम्ही आमच्या पुतण्याला आमच्याबाबत वाईट शिकवितात असे म्हणून कुऱ्हाडीच्या तुम्ब्याने फिर्यादी तुळसाबाई व त्यांचा मुलगा विश्वनाथ धोत्रे याला मारहाण करून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत अक्षय मच्छिंद्र धनवटे, मच्छिंद्र बाळासाहेब धनवटे, चंद्रकला मच्छिंद्र धनवटे, राणी अक्षय धनवटे सर्व रा. तांदूळनेर या चार जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास राहुरी पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News woman broke into the house and was beaten 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here