Home अहमदनगर Ahmednagar News: ट्रॅक्टरखाली सापडून मजूर ठार

Ahmednagar News: ट्रॅक्टरखाली सापडून मजूर ठार

Ahmednagar News Laborer found under tractor killed

श्रीरामपूर | Ahmednagar News: श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी  हद्द पट्यावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली सापडून वैजापूर तालुक्यात बाजाठान येथील ज्ञानेश्वर रामू दळे वय ३८ या तरुण कामगाराचा दबून जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक ७ जुलै रोजी पहाटे चार वाजता घडली.

जेसीबीच्या सहायाने गोदावरी नदीपात्रातून वाळू उपसा सुरु आहे. एका वाळू तस्कराच्या शेतात भला मोठा साठा आहे. त्याच्याकडे हा तरुण कामावर होता.

या घटनेअगोदर ज्ञानेश्वरशी वडिलांचा मोबाईल संपर्क झाला होता. वडिलांनी एवढा उशीर का का झाला म्हणून चौकशी केली होती. अन तासाभरात श्रीरामपूरला साखर कामगार रुग्णालयात दाखल केल्याचा निरोप आला. पाऊस येणार म्हणून वाळू तस्कर सुसाट वाळू वाहतूक करत होते. ज्ञानेश्वरला घरी जाण्यास मज्जाव करत असावे या वादातून आम्हाला घातपात झाल्याचा संशय येत असल्याची तक्रार वडील रामू दळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: Ahmednagar News Laborer found under tractor killed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here