शाळा सुरु होणार, शासनाचा पुन्हा नव्याने आदेश जारी
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने 8 वी ते १२ वी शाळा सुरू करण्याबाबत यापूर्वी शासन निर्णय जारी केला होता. तथापि तो शासन निर्णय २४ तासाच्या आत मागे घेण्यात आला होता. मात्र शासनाने आज पुन्हा नव्या सूचना देऊन सुरू करण्या संदर्भाने आदेश देण्यात आले आहे.
ग्रामीण भागात कोविड मुक्त गावातील ग्रामपंचायतीने गावातील शाळेतील इयत्ता ८ वी ते इयत्ता १२ वी चे वर्ग सुरू करणेबाबत पालकांशी चर्चा करून ठराव करावा. ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे समिती गठीत करावी. सरपंच, तलाठी, अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या समितीने शाळा सुरू करण्यापूर्वी खालील बाबीवर चर्चा करावी.
ग्रामीण भागात ८वी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना
ग्रामपंचायत स्तरावर संरपंच यांच्या अध्यक्षतेखाली तलाठी, शाळा व्यवस्थापन समिती, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामसेवक,मुख्यध्यापक आणि केंद्रप्रमुख यांची समिती गठीत करून शाळा सुरु होण्यासाठी चर्चा करावी .
शाळेत कोणी कोरोनाग्रस्त आढळल्यास शाळा तात्काळ बंद करावी.
टप्प्या टप्प्याने शाळा सुरु करावी. अदला बदलीच्या दिवशी महत्त्वाच्या विषयांना प्राधान्य द्यावे.
शिक्षकांच्या राहण्याची सोय गावातच करावी. शिक्षकांनी सार्वजनिक वाहतूकीचा पर्याय टाळावा.
वर्गात एका बाकावर एक विद्यार्थी बसवावा. दोन बाकांमध्ये ६ फूटांचे अंतर ठेवावे. एका वर्गात जास्तीत जास्त १५ ते २० विद्यार्थी असावेत.
शाळा सुरु होण्यापूर्वी ‘चला मुलांनो शाळेत चला’ अशी मोहिम शाळेने राबवावी.
शाळेत हात धुण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन द्यावी.
शाळेत कोरोना सेंटर असल्यास ते एक तिथून दुसऱ्या ठिकाणी हलवावे आणि शाळेचे त्वरित निर्जुंकिकरण करावे.
शाळेत विलगीवकरण केंद्र असेल्यास तिथे शाळा भरवणे शक्य नसल्याचे खुल्या परिसरात शाळा भरवावी.
शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची RTPCR चाचणी करणे अनिवार्य.
सतत हात साबणाने हात धुणे, मास्कचा वापर,सोशल डिस्टन्सिंग पाळणे यासारख्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे विद्यार्थी तसेच शिक्षकांना अनिवार्य आहे.
Web Title: School Will Be started New Gr state Govt