Home Suicide News संगमनेर: शेतजमिनीच्या वादातून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

संगमनेर: शेतजमिनीच्या वादातून महिलेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Crime News Woman commits suicide by jumping into well

संगमनेर | Crime News: स्वतःच्या जमिनीवर ताबा दाखवून व जमीन नाही तर १ कोटी रुपये द्या असे म्हणत नेहमीच आरोपीच त्रास देत असत तसेच जमीन व पैशासाठी घरातील माणसांना जीवे मारून टाकू, रॉकेल ओतून पेटवून देऊ अशा जाचाला कंटाळून एका विवाहित महिलेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (suicide) केल्याची घटना संगमनेर शहरालगत घुलेवाडी येथे मंगळवारी रात्री घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून एकास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घुलेवाडी येथे मयत महिला सुनीता रामनाथ राउत या आपल्या कुटुंबासह राहत होत्या. दरम्यान आरोपी अविनाश रंगनाथ आरोटे रा. अकोले व बापूसाहेब माधव निभे रा. प्रवरानगर लोणी यांच्यासोबत जमिनीवरून वाद होता. या वादातून नेहमीच आमच्या आईची जमीन आम्हाला परत द्या नाहीतर एक कोटी रुपये द्या असे म्हणत सुनीता यांना त्रास देत होते. तुमचे घरदार पेटवून देऊ, कुणालाही सोडणार नाही अशा धमक्याही नेहमीच देत असे. अखेर या त्रासाला कंटाळून सुनिता हिने मंगळवारी घुलेवाडी येथील भरलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी मयताच्या पतीने फिर्याद दिल्याने दोन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime News Woman commits suicide by jumping into well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here