Home अहमदनगर तरुणावर ब्लेडने वार करत मारहाण, जीवे मारण्याची धमकी

तरुणावर ब्लेडने वार करत मारहाण, जीवे मारण्याची धमकी

Crime News Young man beaten with a blade

राहुरी | Crime News: घरात झोपेत असलेल्या तरुणाला आरडाओरडा करून उठवत आणि ब्लेडने वार करून लाकडी दांडक्याने मारहाण केली तसेच संपूर्ण कुटुंबास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे घडली आहे.

विजय सुनील आडसूळ याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी सुधीर उर्फ सुक्या याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, विजय आडसूळ हा दिनांक २ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याच्या घरात झोपला होता. त्यावेळी सुक्या रा. देवळाली प्रवरा हा अनाधिकाराने त्याच्या घरात घुसला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करून तुझा भाऊ अजय कोठे आहे असे म्हणाला. त्यावेळी विजय म्हणाला की, काय झाले तू मोठमोठ्याने घरात आरडाओरडा करू नको असे म्हणाल्याचा राग येऊन आरोपीने शिवीगाळ करून ब्लेडने वार केले. तसेच लाकडी दांड्याने मारहाण केली. तुझा भाऊ अजय यास समजावून सांग नाहीतर तुमच्या सर्व कुटुंबाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली असे फिर्यादीत म्हंटले आहे.

Web Title: Crime News Young man beaten with a blade

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here