Home अहमदनगर महाविद्यालयीन वादातून तरुणास बांधून माराहाण व व्हिडियो प्रसारित

महाविद्यालयीन वादातून तरुणास बांधून माराहाण व व्हिडियो प्रसारित

Crime News Young man tied up and beaten in a college dispute

श्रीगोंदे | Crime News: शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे  महाविद्यालयात ११ वी कला शाखेत शिकणाऱ्या एका तरुणाला वर्गात शिकत असताना बेंचवर बसण्याच्या वादातून मारहाण करण्यात आली. त्या तरुणाला बांधून बेदम मारहाण करत व्हिडियो काढत सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात. याप्रकरणी श्रीगोंदे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारहाण करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलें आहे. श्रीगोंदे शहरातील महाराजा जिवाजीराव शिंदे  महाविद्यालयात ११ वी कला शाखेत शिकणाऱ्या ओंकार गलांडे या घुगलवडगाव येथील युवकाला ७ डिसेंबरला दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास कॉलेज सुटल्यानंतर कॉलेजबाहेरील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या दोन अल्पवयीन मुलांनी पेट्रोल पंपावर जाऊ तुझ्याकडे एक काम आहे. असे म्हणत त्याच्याकडील मोपेड गाडीवर वसवून नेले. इसार पम्पाशेजारी असलेल्या बागेत घेऊन गेले आणि ओंकारला दम दिला की, तुझ्या वर्गातील अश्पाक सय्यद व कपिल शेख यांच्यासोबत भांडण का केले. म्हणून ओंकारला शिवीगाळ करत माराहणं करण्यात आली. ओमकारला रस्सीने हाताला बांधले व पडलेल्या लाकडी दांड्याने जबरी मारहाण केली. या सर्वांचे चित्रीकरण त्यांच्या मित्रांनी केले. आणि हा मारहाणीचा व्हिडियो सामाजिक माध्यमांवर टाकण्यात आला. बाकावर बसण्याच्या  किरकोळ वादातून हा वाद निर्माण झाला.

Web Title: Crime News Young man tied up and beaten in a college dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here