Home अहमदनगर Crime News: पोलीस कर्मचाऱ्यानेच केला तरुणीवर अत्याचार

Crime News: पोलीस कर्मचाऱ्यानेच केला तरुणीवर अत्याचार

Crime Newsgirl was tortured by a police officer

अहमदनगर | Crime News: तोफखाना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्याने एका तरुणीवर अत्याचार केल्याचा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शकील सय्यद असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या तरुणीवर सय्यद याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.  याप्रकरणी पिडीत तरुणीने फिर्याद दाखल केली आहे.

सय्यद हा पोलीस कर्मचारी तोफखाना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण (डीबी) शाखेत काम करतो. ८ ऑक्टोबरला रात्री त्याने तरुणीला कारमध्ये बसवून विळद घाट परिसरातील नंबळक बायपास रोडने निर्जन ठिकाणी आले. सय्यद याने कारमध्येच तरुणीवर जबरदस्ती करून अत्याचार केला.

तरुणी त्याला म्हणाली, तुझ्या विरोधात  गुन्हा दाखल करेल. तेव्हा तो म्हणाला, मी एक पोलीस आहे. माझे अनेक मोठमोठ्या गुन्हेगारांशी संबंध आहे. तुला कापून फेकून देईल, असे म्हटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेने शहर पोलीस दलात खळबळ उडाली असून चर्चेस उधान आले आहे.

Web Title: Crime Newsgirl was tortured by a police officer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here