Home अहमदनगर तहसील कार्यालयातील लिपिकावर लाच मागितल्याचा गुन्हा

तहसील कार्यालयातील लिपिकावर लाच मागितल्याचा गुन्हा

Shevgaon Bribe News: लिपिकाने सात-बारावरील दंडाचा बोजा कमी करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली.

Crime of demanding bribe from clerk in tehsil office

शेवगाव: शेवगाव येथील तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या लिपिकाने सात-बारावरील दंडाचा बोजा कमी करण्यासाठी लागणारे पत्र देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागितली. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित लिपिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाच महिन्यात दुसरा लिपिक लाचेच्या जाळ्यात अडकल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

मनोज रामचंद्र जाधव (वय ३९ वर्षे) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. यासंदर्भात तालुक्यातील सामनगाव येथून तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या जमिनीवर गौण खनिज साठा मिळून आला म्हणून शेवगाव

तहसीलदारांनी त्यांना ३४ लाख ५० हजार रुपये दंड करून सदर दंड रक्कम त्यांच्या सात-बारा उताऱ्यावर नोंदविली. तक्रारदाराने कारवाईसंदर्भात पाथर्डी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केले. अपिलामध्ये तहसीलदारांचा आदेश रद्द ठरविण्यात आला. उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाच्या अनुषंगाने बोजा कमी करण्याबाबतचे तहसीलदारांचे पत्र संबंधित तलाठी यांना देण्याकरिता लिपिक जाधव यांनी तक्रारदाराकडे ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिलेल्या तक्रारीवरून दि. २४ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता, त्यात तथ्य आढळले. त्यानुसार जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Crime of demanding bribe from clerk in tehsil office

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here