Home अहमदनगर अवैध गौण खनिज वाहणारा ट्रॅक्टर थांबविले असता तहसीलदारासह, अधिकाऱ्यांना मारहाण

अवैध गौण खनिज वाहणारा ट्रॅक्टर थांबविले असता तहसीलदारासह, अधिकाऱ्यांना मारहाण

Ahmednagar Crime News:  अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना.

Crime Officers including Tehsildar were beaten up when a tractor carrying illegal secondary minerals 

शेवगाव : अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना हसनापूर (ता. शेवगाव) शिवारात रविवारी (दि. २) रात्री ही घडली. या घटनेत परीविक्षाधीन नायब तहसीलदार, कारकून व आणखी एक जण असे तिघे जखमी झाले. याप्रकरणी शेवगाव पोलिसांनी एकास अटक केली आहे. तिघे फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याबाबत शेवगाव पोलिस ठाण्यात नायब तहसीलदार राहुल पोपट गुरव यांनी फिर्याद दिली आहे. यावरून विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अंगद अर्जुन ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे, अर्जुन विष्णू ढाकणे या चौघांच्या विरोधात जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे, विविध लागले. कलमांन्वये गुन्हा दाखल झाला.

नायब तहसीलदार राहुल गुरव व अव्वल कारकून रवींद्र सानप, तलाठी सचिन सुरेश लोहकरे, सोमनाथ प्रकाश आमने हे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईसाठी सुरुवात केली. हसनापूर (ता. शेवगाव) येथे गेले होते. यावेळी गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. त्यास थांबविले असता ट्रॅक्टरवरील चालक तेथून पळून गेला. त्यानंतर तिथे दुचाकीवर अर्जुन विष्णू ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे हे दोघे आले. ‘तुमच्या सारखे पुष्कळ अधिकारी बघितले आहेत. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. काय करायचे ते करा, आम्ही तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेणार नाही, असे महसूल पथकाला धमकावले. त्याच आहे. वेळी विठ्ठल ढाकणे, अंगद ढाकणे दुचाकीवरून काठ्या व लोखंडी गज घेऊन तिथे आले. शिवीगाळ करू लागले. यावेळी विठ्ठल ढाकणे हा ट्रॅक्टर पळवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना त्यास अडविण्याचा प्रयत्न केला. याचा राग आल्याने त्यांनी गुरव व सानप यांना मारहाण करण्यास सुरवात केली. आता यांना जिवंत मारून टाकतो, असे म्हणत विठ्ठल ढाकणे याने दगडी पाटा उचलून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सचिन लोहकरे यांनी बाजूला ओढले. त्यामुळे गुरव यांच्या डाव्या हाताला पाटा लागला. रवींद्र सानप यांच्या डाव्या हाताला, सचिन लोहकरे यांच्या पाठीवर, उजव्या खांद्यावर, तसेच सोमनाथ आमने यांच्या डाव्या खांद्यावर, कोपरावर दोन्ही गुडघ्यावर जखमा झाल्याचे फिर्यादीत म्हटले. याप्रकरणी अर्जुन ढाकणे यास शेवगाव पोलिसांनी सोमवारी पहाटे सुमारास अटक केली आहे. तर उर्वरित फरार झाले.

Web Title: Crime Officers including Tehsildar were beaten up when a tractor carrying illegal secondary minerals 

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here