Home अहमदनगर अहमदनगर: पोलिस पाटलानेच केले धारदार शस्त्राने वार !

अहमदनगर: पोलिस पाटलानेच केले धारदार शस्त्राने वार !

Breaking News | Ahmednagar Crime: पोलिस पाटील याने दारुच्या नशेत गावातील एकावर लोखंडी हत्याराने सपासप वार करत जखमी केल्याची घटना.

Crime police Patil was stabbed with a sharp weapon

नेवासा : तालुक्यातील जळके बुद्रुक येथील पोलिस पाटील अशोक पुंड याने दारुच्या नशेत गावातील एकावर लोखंडी हत्याराने सपासप वार करत जखमी केले. ही खळबळजनक घटना शनिवारी (दि.६) रोजी रात्री ८ वाजता घडली. मध्यस्थीस गेलेल्या जखमीच्या पत्नीलाही मारहाण करण्यात आली.

 जळके बुद्रुक येथील बळीराम दत्तात्रय नाईक (वय ५०) हा शनिवारी रात्री ८ वाजका गावातील लक्ष्मी मंदिराजवळ बसला होता. पोलिस पाटील अशोक पुंड दारुच्या नशेत तेथे आला. त्याने नाईक याला मारहाण सुरू केली. त्यातून सुटका करून घेत नाईक घरी निघून गेला. पोलिस पाटील पुंड याने घरी जाऊन लोखंडी शस्त्राने नाईक याच्या डोक्यात सपासप वार केले. जखमीची पत्नी सुनीता नाईक पतीला वाचविण्यासाठी मध्यस्थी करीत असताना पोलिस पाटलाने तिच्या श्रीमुखात भडकावल्या. या घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांनी पोलिस पाटलाला ताब्यात घेतले. जखमी बळीराम नाईक यांच्यावर नेवासा फाटा येथील एका खासगी दवाखाण्यात औषधोपचार सुरु आहेत. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात पोलिस पाटील पुंड याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Crime police Patil was stabbed with a sharp weapon

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here