Home क्राईम Crime | संगमनेरच्या कारागृहात कैद्यांची हाणामारी

Crime | संगमनेरच्या कारागृहात कैद्यांची हाणामारी

Crime Prisoners fight in Sangamner jail

Sangamner Crime | संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या तुरुंगातील आरोपींनी एका आरोपीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलीराज शब्बीर शेख असे जखमीचे नाव आहे. संदीप सुखदेव हजारे, जनाकू लिंबाजी दुधावडे, विवेक गोरक्षनाथ कोल्हे, गोरक्ष संजय यादव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात असणाऱ्या तुरुंगात Baryak No: 2  मध्ये अटकेत असलेल्या आरोपींमध्ये भांडणे होऊन न्यायालयीन कोठडीत असलेला अलीराज शब्बीर शेख याला मारहाण केल्याची फिर्याद पोलिसांनी दिली. ही घटना ३० मार्च रोजी घडली. याची फिर्याद ४ एप्रिल रोजी देण्यात आल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक राहुल मदने तसेच पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Crime Prisoners fight in Sangamner jail

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here