Home संगमनेर संगमनेर: शेततळ्यात बुडून महिलेचा मृत्यू

संगमनेर: शेततळ्यात बुडून महिलेचा मृत्यू

Sangamner Woman drowned in farm

Sangamner | संगमनेर: नांदूर खंदरमाळ येथील ललिता रावसाहेब भागवत वय ३६ या महिलेचा शेततळ्यात बुडून (drowned) मृत्यू झाल्याची घटना  मंगळवारी रात्री घडली.  पतीसोबत त्या रात्री पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी पती शेतात पाणी देत होते. अंधारात शेततळ्याच्या बांधावरून जात असताना पाय घसरून शेततळ्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी व आसपासच्या गावकर्यांनी मदतीसाठी धाव घेतली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दत्ताताय अप्पा भागवत यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Sangamner Woman drowned in farm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here