Home संगमनेर संगमनेर तालुक्यात घरफोडी, चार लाखांचे सोनेसह रोकड  लंपास

संगमनेर तालुक्यात घरफोडी, चार लाखांचे सोनेसह रोकड  लंपास

Burglary in Sangamner taluka, cash theft with gold worth four lakhs

Sangamner | संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील पूर्व भागाकडील असणार्‍या पिंप्री लौकी अझमपूर येथील घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश करत बेडरुम मधील असणार्‍या लाकडी कपाट फोडून चोरट्यांनी 40 हजारांच्या रोकडसह नऊ तोळे 7 ग्रॅम सोन्याचे दागिने असा 4 लाख 19 हजार 200 रुपये किमतीचा ऐवज चोरून (Theft) नेला. ही घटना रविवारी रात्री ते पहाटेदरम्यान घडली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत गणेश सोपान दातीर यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, गावाच्या दक्षिण बाजूस असणार्‍या शेतात राहतो आजू बाजूस बर्‍याच अंतरावर वस्त्या आहेत. उन्हाळ्या दिवस असल्याने गरम फार होत असल्याकारणाने संपूर्ण कुटुंब हे घराच्या गच्चीवर रात्री साडे दहाच्या नंतर दरवाजाला कुलूप लावून झोपण्यास गेले. चोरट्यांनी घरात कोणी नसल्याची संधी साधून घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यातील एक दाणी सर, ओमपान, नथ, आंगठ्या, मचल्या, नॅकलेस, मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, रिंगा अशा दागिन्यांच्या ऐवजासह 40 हजार रुपयांची रोकड असा 4 लाख 19 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.

सकाळी 6 वाजता गच्चीवरुन खाली आल्यावर दातीर यांना चोरी झाल्याचे आढळून आले. त्यांनी तात्काळ आश्वी पोलीस ठाण्यास खबर दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुभाषराव भोये हे आपल्या फौज फाट्यासह तातडीने दाखल झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. दरम्यान उपविभागीय पोलीस आधिकारी राहुल मदने यांनी देखील घटना स्थळी जाऊन घटनेची माहिती घेतली. गणेश दातीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोलीस निरीक्षक सुभाषराव भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: Burglary in Sangamner taluka, cash theft with gold worth four lakhs

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here