Home अहमदनगर श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबध ठेवून अश्लील व्हिडियो बनवत १ कोटीची खंडणी...

श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबध ठेवून अश्लील व्हिडियो बनवत १ कोटीची खंडणी मागितली

Crime ransom for making pornographic videos

अहमदनगर | Crime: श्रीमंत व्यावसायिकास जाळ्यात ओढून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत अश्लील व्हिडियो बनवून १ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या महिला व  तिच्या साथीदारास नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे.

अमोल सुरेश मोरे वय ३० रा. कायनेटिक चौक अहमदनगर असे अटक केलेल्या महिलेच्या साथीदाराचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, नगर तालुक्यातील जखणगाव येथे ३० वर्षीय आरोपी महिला राहते. तिने एका श्रीमंत व्यावसायिकास शरीरसंबधाचे आमिष दाखवत २६ एप्रिल रोजी घरी बोलाविले. यावेळी या नगर तालुक्यातील व्यावसायिकास शरीरसंबध ठेवण्यास भाग पडून साथीदार अमोल मोरे याच्या मदतीने व्हिडियो काढण्यात आला. हा व्हिडियो बनवून तयार होताच आरोपींनी एक कोटी रुपये आणून दे नाहीतर सदर व्हिडियो हा पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेल अशी धमकी दिली. आरोपींनी त्या व्यावसायिकास दोरीने बांधून मारहाण करत त्याच्याकडील ५ तोळे सोन्याची चैन, अंगठ्या, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ४४ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेतला. या घटनेने व्यावसायिक घाबरून शांत राहिला मात्र सदर महिलेचा त्रास असह्य झाल्याने त्याने नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांच्याकडे सर्व घटनाक्रम कथित केला. त्यांनतर सानप यांच्या पथकाने शनिवारी सकाळीच सदर महिला व साथीदार अमोल मोरे यास अटक केली आहे. या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime ransom for making pornographic videos

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here