Home अकोले मच्छिंद्र धुमाळ यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मच्छिंद्र धुमाळ यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Crime registered Machhindra Dhumal at Akole police station 

अकोले | Akole Crime:  माजी प्रशासकीय अधिकारी बी. जे. देशमुख यांची बदनामी केल्याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ यांच्यावर अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

बी. जे. देशमुख यांनी भ्रष्टाचार केल्याचे आरोप त्यांनी केले होते. त्यांनी ३१ मार्च २०२१ रोजी अगस्ती कारखान्याची वार्षिक सभा होती. या सभेनंतर एका चॅनेल व वेबसाईटला संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी बदनामी केली होती.

यावर बी. जे. देशमुख म्हणाले मी खरोखर आरोप केले असतील तर न्यायालयात पुरावे सादर करावे. आपण शिवराळ भाषेत उत्तर देणार नाही तर न्यायालयात दाद मागणार आहोत.

माझा प्रशासकीय सेवेचा काळ स्वच्छ व पारदर्शी राहिल्याने पुणे बाजारसमितीत सेवानिवृत्तीनंतर एक वर्ष मुदतवाढ मिळाली. आपल्या काराभारची चौकशी होऊन क्लीन चीट मिळाली असून त्याचा कागद आपल्याकडे आहे. माझ्यावर आरोप करणार्यांनी न्यायालयात येऊन ते सिद्ध करावे.

चांगल्या माणसांना बदनाम करणारी टोळी तालुक्यात सक्रीय झाली असून आता आपण जशास तसे उत्तर देऊ असा सूचक इशारा देशमुख यांनी दिला आहे.

Web Title: Crime registered Machhindra Dhumal at Akole police station 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here