Home अकोले अकोलेत एकास जातीवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल

अकोलेत एकास जातीवाचक शिवीगाळ, गुन्हा दाखल

A racist abuse in Akole

अकोले: नवलेवाडी परिसरातील जागा एन.ए. करण्याकरीता दिलेले पैसे परत घेण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबास जातीवाचक शिवीगाळ करत कानशिलात मारली. जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी जनार्धन कमलाकर नवले रा. नवलेवाडी यांच्यावर अनुसूचित जाती जमातीच्या कायदा अंतर्गत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विवाहितेने अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीनुसार आमचा गुरव झाप शिवारात २० गुंठे शेतीचा प्लॉट आहे. हा प्लॉट एन.ए. करावयाचा असल्याने नवलेवाडी येथील जनार्धन कमलाकर नवले यांच्यासोबत जानेवारी २०१७ मध्ये त्यांना एन,ए, करण्यापोटी एक लाख रुपये दिले. त्यांच्याकडून पैसे दिल्याची पावती लिहून घेतली होती. मात्र एक वर्षापर्यंत आमचा प्लॉट एन,ए. करून दिला नाही. आम्ही त्यांना विचारणा केली असता त्याने उडवा उडवीचे उत्तर देत आमच्याशी वाद घालत होता. त्यावेळी माझे पती यांनी अकोले पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. बुधवारी सायंकाळी मी व माझे पती नवले यांना दिलेले पैसे घेण्यासाठी नवले यांचे बिल्डींगच्या खाली जाऊन पैसे मागितले असता त्यांनी माझ्या हाताला धरून ओढतान करू लागला. तेव्हा माझे अपंग असलेले पती मला सोडविण्यासाठी आले असता त्यांना नवले यांनी शिवीगाळ करून कानशिलात मारली. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी केली.

या फिर्यादीवरून जनार्दन नवले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जनार्दन नवले यास अटक करून संगमनेर न्यायालयासमोर उभे केले असता त्याला २८ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे.  

Web Title: A racist abuse in Akole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here