Home अहमदनगर नगरमध्ये बनावट चहापत्तीची विक्री, दुकानावर पोलिसांचा छापा

नगरमध्ये बनावट चहापत्तीची विक्री, दुकानावर पोलिसांचा छापा

Ahmednagar: नगरमध्ये बनावट चहापत्तीची विक्री, नगर शहरातील दाळमंडई भागातील दुकानावर पोलिसांनी कारवाई केली.  व्यापाऱ्याविरोधात गुन्हा.

Crime Sale of fake tea in the city, police raid the shop

अहमदनगर शहरातील दाळमंडई येथील दुकानावर छापा टाकत पोलिसांनी बनावट सपट परिवार कंपनीची २० पाकिटे जप्त केली. कंपनीचे सेल्स मॅनेजर अजय मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर मुनोत (३१, रा. दाळमंडई, नगर) या व्यापाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरात सपट परिवार चहा या कंपनीचे बनावट पाऊच तयार करून त्यात निकृष्ट दर्जाची चहापत्ती भरून विक्री होत असल्याची माहिती कंपनी बनावट पाऊच तयार करून विक्री व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यामुळे सपट इंटरनॅशनल प्रा. लि. या कंपनीने बनावट पाऊच तयार करून चहापत्तीची विक्री करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार कंपनीचे नगर जिल्ह्याचे केली. एरिया सेल्स मॅनेजर अजय मोरे, सूरज सीताराम साळवे (एरिया सेल्स एक्झिक्युटीव्ह), किरण पानमळकर (सेल्स अधिकारी), विठ्ठल महाजन (सल्लागार) यांनी नगरमध्ये येऊन चौकशी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक पाटील यांच्या आदेशानुसार तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुखदेव दुर्गे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय कदम, अतुल काजळे, सलीम शेख आदींच्या पथकाने कंपनीच्या प्रतिनिधींसोबत जाऊन डाळमंडई येथील सागर ट्रेडर्स या दकानावर छापा टाकला असता दुकानात परिवार चहा कंपनीसारखे हुबेहूब दिसणारे दहा रुपये किमतीचे २० पाऊच आढळून आले. पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दुकान मालक सागर मुनोत याच्याविरोधात कॉपीराईट अॅक्ट १९५७ नुसार कलम ६३, व्यापार चिन्ह अधिनियम १९९९च्या कलम १०३ व १०४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

विविध कंपन्यांचे बनावट पाऊच तयार करून निकृष्ट दर्जाच्या मालाची विक्री केल्याच्या घटना घडत आहेत. यापूर्वी असे प्रकार उघडकीस आले असून, अन्न व औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मानवी आरोग्यास धोकादायक असलेल्या खाद्यपदार्थाचीही अशाप्रकारे विक्री केली जात असून, आदेश याचाही तपास करण्याची आवश्यकता आहे.

Web Title: Crime Sale of fake tea in the city, police raid the shop

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here