अल्पवयीन मुलीस त्रास देणाऱ्या तिघांना अटक- Arrested
Ahmednagar Crime| Karjat News: पोलिसांची कारवाई (Arrested), चौदा दिवसांची कोठडी.
कर्जत : अल्पवयीन शाळकरी मुलीचा सतत पाठलाग करून त्रास देणाऱ्या राशीन येथील तीन तरुणांना कर्जत पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला. तिन्ही तरुणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.
कामानिमित्त परगावाहून आलेल्या अल्पवयीन शाळकरी मुलीचा शाळेत जात असताना तिच्या मागे-मागे फिरत अमोल दादा दानवले (दानवले वस्ती, राशीन) हा त्रास देत होता. याबाबत निर्भयाने आपल्या कुटुंबीयांनाही माहिती दिली होती. मात्र कुटुंबाची बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती. वेळोवेळी आरोपी अमोल दादा दानवले व त्याचे मित्र गणेश हौसराव सुरवसे, मुरलीधर सायकर, केतन गायकवाड (रा. राशीन) हे सर्व मुलीचा पाठलाग करत होते. यावेळी गर्दीचा फायदा घेत अमोल दानवले याने मुलीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मुलीने आरडा-ओरड केली. तिच्या वडिलांनी संबंधित तरुणांना माझ्या मुलीचा पाठलाग करत जाऊ नका’ असे सांगितले.
यावेळी सदर तरुणांना याचा राग आल्याने गणेश सुरवसे याने मुलीच्या वडिलांच्या पोटात चाकू मारून दुखापत केली. वडिलांना वाचविण्यासाठी आलेल्या मुलीच्या उजव्या हाताच्या दंडावर चाकू मारून गणेश सुरवसे याने किरकोळ दुखापत केली. आरडाओरड झाल्याने सर्वांनी तेथून पळ काढला. हा प्रकार कर्जत पोलीस ठाण्यात आला.
Web Title: Three arrested for harassing minor girl