Home संगमनेर संगमनेर: युवकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या- Suicide

संगमनेर: युवकाची विषारी औषध घेऊन आत्महत्या- Suicide

Sangamner Suicide News:  ऊसाच्या क्षेत्रात कडेला मृत अवस्थेत पडलेला आढळून आला.

Youth committed suicide by taking poisonous medicine

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथिल अजय कैलास नागरे (वय २५) या तरुणाने गुरुवारी दुपारी विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबत आश्वी पोलिसांना शेडगावचे पोलीस पाटील दिलीप सांगळे यानी दिलेली माहिती अशी की, दि. २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या -सुमारास राजेद्र देवराम आंधळे यानी माहिती कळवली. फोन करुन माहिती दिली की, अजय कैलास नागरे हा अंबादास म्हतु नागरे याच्या गट नंबर २७१ / २ मधील ऊसाच्या क्षेत्रात कडेला मृत अवस्थेत पडलेला आहे. तसेच त्यांच्या कडेला विषारी औषधाची बाटली पडलेली असून त्याच्या तोडाचा वास येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन याबाबत अजय नागरे यांना पुढील उपचारासाठी लोणी येथिल प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठवले मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषीत केली.  

अजय नागरे यांच्या आत्महत्याने परिसरात शोककळा पसरली असून सायंकाळी उशीरा शोकाकूल वातावरणात अजय नागरे याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले आहे.

Web Title: Youth committed suicide by taking poisonous medicine

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here