Home अहमदनगर बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ

बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ

Ahmednagar | Parner:  Taluka Sultanpur Found Dead body.

Parner Found of the abandoned Dead body

पारनेर: तालुक्यातील म्हसणे सुलतानपूर शिवारात एक बेवारस मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी रात्री ही घटना उघडकीस आली.

गुरुवारी रात्री म्हसणे-वडनेर रोडवर तुकाई मंदीराजवळ दंगाबाज मळ्याजवळ एक अनोळखी मृतदेह आढळून आल्याची  माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ नितीनकुमार गोकावे, पो संपत खैरे, यंशवत ठोबरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव केली असता रस्ताच्या कडेलाच एक तरुण मृत अवस्थेत आढळला.

पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनात म्हटले आहे, त्याच्या चेहरा उभा असुन अंगात विटकरी कलरचा चौकडी शर्ट असुन निळी पँट घातलेली आहे. त्याच्या गळ्यावर SKY असे इंग्रजी मध्ये गोंधलेले असुन हाता वर सलाईन लावल्याची पट्टी आहे.

सुपा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुपा पोलिसांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन उत्तराय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाचा शोध लागेपर्यंत अहमदनगर येथील सिव्हील रुग्णालयातील शवगारात ठेवण्यात आला असून अधिक तपास पोलिस नायक यशवंत ठोबरे हे करत आहे.

Web Title: Parner Found of the abandoned Dead body

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here