अहमदनगर: कार- मोटारसायकल अपघातात एक ठार- Accident
Ahmednagar | Kopargaon Accident News: संवत्सर हद्दीत मुंबई-नागपूर या महामार्गावर दुचाकीस समोरून येणाऱ्या कारने हॉटेल वक्रतुंड जवळ जोराची धडक देऊन त्यात मोटासारकाल स्वार मृत्यू.
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर हद्दीत मुंबई-नागपूर या महामार्गावर दुचाकीस समोरून येणाऱ्या कारने हॉटेल वक्रतुंड जवळ जोराची धडक देऊन त्यात मोटासारकाल स्वार लखन फुलचंद राठोड (वय- (३५) रा. शिवाचीवाडी, ता. जिंतूर, जि. परभणी हा इसम जखमी होऊन उपचारा दरम्यान त्याचे निधन झाले आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी राजकुमार श्रीराम राठोड (वय २३) हे परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील शिवाचीवाडी येथील रहिवासी आहेत. त्यांचे चुलते लखन फुलचंद राठोड (वय ३५) हे आपल्या – दुचाकीवरून नालासोपारा येथून दि. २० जुलै रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आहे. आपल्या हिरोहोंडा शाईनवर (क्र.एम.एच.०९ सी. सी. ०१६२) या दुचाकीवर बसून जात असताना मुंबई-नागपूर या महामार्गावर संवत्सर शिवारात हॉटेल वक्रतुंड जवळ त्यांना एका पांढऱ्या कार (क्रं. एम. एच. ४३ बी. जी. १३८९) वरील अज्ञात चालकाने जोराची धडक दिली आहे. या अपघातात फिर्यादीचा चुलता गंभीर जखमी झाला आहे. त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तथापि त्यात त्यांचे निधन झालं.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी भेट दिली आहे. या प्रकरणी फिर्यादी आहेत. राजकुमार राठोड यांनी त्यांचा दश कि या विधी पार पडल्यानंतर अज्ञात चालका विरुद्ध हा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु. र. क्रं. २६२ / २०२२ भा. द. वि. कलम ३०४(अ) २७९, ३३७, ३३८, ४२८, मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४, (अ) (ब), १७७ प्रमाणे दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस हे. कॉ. आर. पी. पुंड हे करीत आहे.
Web Title: Kopargaon One killed in car-motorcycle accident