Home क्राईम Rape | शहरात खळबळ! सेल्स मॅनेजरने महिला डॉक्टरवर केला बलात्कार

Rape | शहरात खळबळ! सेल्स मॅनेजरने महिला डॉक्टरवर केला बलात्कार

Pune Rape News:  सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर बलात्कार, सन २०१९ पासून ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संत तुकाराम नगर येथील एका घरामध्ये आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार.

A sales manager rape a woman doctor

पुणे: पिंपरी चिंचवड मधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

नराधम सेल्स मॅनेजरने पीडित महिलेला एका सदनिकेत कोंडून ठेवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेला लग्नाचं आमिष देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिला डॉक्टरने आरोपी विरोधात पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं आरोपी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

अंजिम नूर मोहम्मद तांबोळी असं अटक केलेल्या सेल्स मॅनेजर आरोपीचं नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपरी चिंचवड शहरात एका सेल्स मॅनेजरने बीएएमएस महिला डॉक्टरवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्नाचं आश्वासन देऊन सेल्स मॅनेजरने पीडित महिला डॉक्टरवर बलात्कार केला.

सन २०१९ पासून ते २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संत तुकाराम नगर येथील एका घरामध्ये आरोपीने पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार (Sexual abused) केला. महिला डॉक्टरने पोलिसांत तक्रार करू नये म्हणून पीडित महिला डॉक्टरला आरोपीने एका सदनिकेत कोंडून ठेवलं. या गंभीर प्रकरणाची तातडीनं दखल घेत पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Web Title: A sales manager rape a woman doctor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here