Home अहमदनगर बैलपोळ्यानिमित्ताने प्रवरा नदीपात्रात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

बैलपोळ्यानिमित्ताने प्रवरा नदीपात्रात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

Ahmednagar | Rahuri News: प्रवरा नदीपात्रात शेळ्या धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून (Drowned) मृत्यू.

young man who went to wash goats in Pravara riverbed drowned

राहुरी: राहुरी तालुक्यातील केसापूर येथील अविवाहित तरुण बैलपोळ्यानिमित्ताने प्रवरा नदीपात्रात शेळ्या धुण्यासाठी गेला असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खड्ड्यात पाय घसरून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऋतिक संजय पुंड (वय २१) असे या मयत तरुणाचे नाव आहे.

ऋतिक पुंड हा अतिशय कष्टाळू व होतकरू तरुण होता. श्रीरामपूर येथे मित्राच्या गॅरेजमध्ये फिटरकाम करून व वडिलाच्या हाताखाली सायकल पंचरचे दुकान सांभाळून कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होता. तसेच आई आजारी असल्याने नगर येथे उपचारसाठी गेली होती.

ऋतिकच्या मागे आई, वडील, एक भाऊ व बहिण असा मोठा परिवार आहे. केसापूर येथील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून ऋतिकला नदीपात्रातून बाहेर काढले. लागलीच श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी अगोदरच मृत्यू झाल्याचे घोषित केले. ऋतिकच्या जाण्याने केसापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर केसापूर येथे ऋतिक पुंड याचेवर सायंकाळी पाच वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरु असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. त्यामुळे नदीकिनारी मोठ्या प्रमाणत खड्डे झाले असून अशाच खड्ड्यात पाय घसरून ऋतिक पुंड या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.

Web Title: young man who went to wash goats in Pravara riverbed drowned

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here