Home अहमदनगर दारूच्या नशेत एकाने महिलेसोबत केले असे काही, विनयभंगाचा गुन्हा दाखल

दारूच्या नशेत एकाने महिलेसोबत केले असे काही, विनयभंगाचा गुन्हा दाखल

Crime something to a woman filed a molestation charge

राहुरी | Crime: राहुरी तालुक्यातील मुसळवाडी येथे दारूच्या नशेत महिलेचा विनयभंग करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. याबाबत दिलीप बर्डे या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुसळवाडी येथील ३५ वर्षीय महिलने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिनांक ६ ऑगस्ट रोजी साडे सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला ही तिच्या घरासमोर असताना आरोपी दिलीप गोपीनाथ बर्डे रा. सोनवणे वस्ती, मुसळवाडी हा दारू पिऊन आला व सदर महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिच्या अंगावरील झंपर काढण्याचा प्रकार केला. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ व दमदाटी केली. जीवे मारण्याची धमकी दिली. सदर महिलेचे आई वडील सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही शिवीगाळ केली.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

सदर महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल करत पोलिसांनी दिलीप गोपीनाथ बर्डे याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रभाकर शिरसाठ हे करीत आहे.

Web Title: Crime something to a woman, filed a molestation charge

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here