Home अहमदनगर अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी एकास अटक

Karjat Crime News One arrested for torturing a minor girl

कर्जत | Crime News: कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीस अत्याचार करणाऱ्या आरोपीस कर्जत पोलिसांनी अटक केली आहे. मोहन जोशी निंबाळकर रा. पाटेवाडी असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पिडीत मुलीच्या आईने कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हंटले आहे की, अल्पवयीन मुलगी ही शेळ्या चारण्यासाठी गेली असता पाचशे रुपये देऊन पीडितेला त्याचे घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. तिला काही पैसे दिले. घडलेली घटना तुझ्या आईबापाला सांगितली तर तुला जीवे ठार मारून टाकेल अशी धमकी दिली होती.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

असा प्रकार आरोपी पुन्हा काल करत असताना पिडीतेच्या बहिणीने हा प्रकार बघितला व तिने आई वडिलांना सांगितला. तक्रार दाखल करताच तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, ईश्वर माने, संतोष फुंदे, गोरख जाधव, जयश्री गायकवाड यांनी घटनास्थळ धाव घेतली. आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. पोलीस ठाण्यात आणून त्यास अटक केली.

Web Title: Karjat Crime News One arrested for torturing a minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here