Home महाराष्ट्र ताप आल्याने अल्पवयीन मुलगी क्लिनिकमध्ये गेली असता नराधम डॉक्टरने अश्लील वर्तन करत...

ताप आल्याने अल्पवयीन मुलगी क्लिनिकमध्ये गेली असता नराधम डॉक्टरने अश्लील वर्तन करत केला अत्याचार

Crime The doctor tortured the minor girl

मुंबई | Mumbai Crime: नालासोपाऱ्यातील तुलिंज परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधम डॉक्टरने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अल्पवयीन मुलगी ताप आल्याने उपचारासाठी आर.व्ही. सिंग क्लिनिक मध्ये गेली होती. त्यावेळी एमबीबीएस डॉक्टर आर. व्ही. सिंगने त्या मुलीसोबत अश्लील वर्तवणूक करत अत्याचार केला. याप्रकरणी तुलिंज पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत आरोपी सिंग विरोधात गुन्हा (Crime) दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की,  नालासोपाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरने उपाचारासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. नालासोपाऱ्यात डॉ. आर. व्ही. सिंगचे क्लिनिक आहे. ताप आल्याने उपचार करण्यासाठी एक अल्पवयीन मुलगी या क्लिनिक मध्ये आली. त्यानंतर नराधम डॉक्टरने तिच्यासोबत अश्लील वर्तणूक करुन अत्याचार केला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.  

याप्रकरणी पीडित मुलीने तुलिंज पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी विरोधात तुलिंज पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Crime The doctor tortured the minor girl

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here