Home संगमनेर संगमनेर: नदीवर मासे पकडण्यास गेले असता घडलं भलतच…

संगमनेर: नदीवर मासे पकडण्यास गेले असता घडलं भलतच…

Two-wheeler theft case against an unknown theft Sangamner

संगमनेर | Sanganner:  संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोरबन गावा अंतर्गत असणार्या काळदरा येथील शेतमजूर मुळा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले असता दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची (Theft) घटना घडली. ही घटना शनिवार दिनांक ४ जुन रोजी दुपारी दिड ते चार वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की,  बारकू शिवराम मेंगाळ हे आपल्या कुटुंबासोबत बोरबन गावा अंतर्गत येणाऱ्या काळदरा येथे राहतात. ते मोलमजूरी करुन ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. शनिवारी त्यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम एच १७ ए पी १८३४) हिच्यावरुन सराटी येथील मुळा नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. तेथे गेल्यानंतर अनंथा गाडेकर यांच्या विहीरीजवळ मोटारसायकल लावून ते पायी नदीवर मासे पकडण्यासाठी गेले होते. पुन्हा मासे पकडून आल्यानंतर त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. सगळीकडे शोध  घेतला मात्र मिळून आली नाही अखेर त्यांनी याप्रकरणी घारगांव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Two-wheeler theft case against an unknown theft Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here