Home क्राईम तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील स्पर्श करून पसार

तरुणाने अल्पवयीन मुलीला अश्लील स्पर्श करून पसार

Crime young man passed on the minor girl with obscene touch

डोंबिवली: एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून पळून जाणाऱ्या एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. अमन यादव असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर मानपाडा पोलिस ठाण्यात पोक्सो (Pocso) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली मधील एका इमारतीमध्ये एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने अश्लील स्पर्श करत पसार झाला. मुलगी घाबरली आणि घरी धाव घेत मुलीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो पसार झाला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता.

या तरूणाविरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी या तरुणाचा शोध सुरू केला. परिसरातील सर्व सीसीटीव्ही पोलिसानी तपासले इतकेच नाही तर एका ठिकाणी तोच तरुण त्याच्या बाईकसह आणखी एका सीसीटीव्हीत कैद झाला.

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या बाईकच्या आधारे त्याचा शोध सुरू करत गाडी शोधून काढली पोलिसांनी विकृत अमन यादव याला ताब्यात घेतले आहे.

Web Title: Crime young man passed on the minor girl with obscene touch

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here