संगमनेर | Sangamner Accident: पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील बोटा बायपास जवळ शतपावलीसाठी गेलेल्या दोन शिक्षिकेंचा चारचाकी वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात (Accident) बुधवारी सायंकाळी साडे सहा वाजेच्याच्या सुमारास घडला. या घटनने संगमनेर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
सुनीता रामदास माकोडे व नंदा रामनाथ पारधी असे मृत्यू झालेला शिक्षिकेंची नावे आहेत.
वाचा: Ahmednagar News
याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिक्षिका सुनीता रामदास माकोडे व सेवानिवृत्त शिक्षिका नंदा रामनाथ पारधी या नेहमीप्रमाणे आपल्या घरापासून जवळ असलेल्या बोटा बायपास जवळ सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शतपावली करत असताना त्याच दरम्यान संगमनेरकडून आळेफाट्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने त्यांना जोराची धडक दिली. यावेळी सुनीता माकोडे या जागीच ठार झाल्या तर नंदा पारधी या गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर जखमी शिक्षिकेला औषधोपचारासाठी आळेफाटा ता. जुन्नर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. दोन्ही शिक्षिकेंच्या अपघाती मृत्यूने बोटा गावावर शोककळा पसरली आहे.
Web Title: Sangamner Accident of two teachers near finger bypass while doing centipede