खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हे
लोणी: जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व कोरोनाचे आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी खासदार सदाशिव लोखंडे व कार्यकर्ते यांच्यावर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना आपल्या कार्यकर्त्यांसह पिंपरी निर्मळ शिवारात ४०० केव्ही महावितरण केंद्राजवळ बेकायदेशीर जमाव जमवून जिल्हाधिकारी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व कोरोनाचे आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता साथ रोग नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी राहता तालुक्यातील लोणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार सुदाम फटांगरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. आरपी आयचे राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे यांनी लोणी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता.
खासदार सदाशिव लोखंडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ गोरे, सौरभ शेळके, विठ्ठल शेळके, शिवाजी शेळके, विलास गुळवे, बाबासाहेब पठारे, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crimes against activists including MP Sadashiv Lokhande